Bachhu Kadu
Bachhu KaduTeam Lokshahi

अयोध्या दौऱ्यावरून मी नाराज नाही; लोकांना काम पाहिजे मंत्रीपद नाही - बच्चू कडू

शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

सुरज दहाट, अमरावती

शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यात मात्र शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नसल्याने संजय राऊत यांनी बच्चू कडू नाराज असल्याची टीका केली होती. यावर बच्चू कडू यांनी मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्या कामात व्यस्त होतो, त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. याशिवाय बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ७ ते ८ महिन्यांसाठी मंत्रिपद घेण्यात काही अर्थ नाहीये. शिंदे फडणवीस सरकारने भरभरून निधी दिला आहे. लोकांना पदापेक्षा काम करणं महत्त्वाचं वाटते. आणि आम्ही काम करतो आहोत अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com