Ambadas Danve : महायुतीकडून मला कोणतीही ऑफर नाही

Ambadas Danve : महायुतीकडून मला कोणतीही ऑफर नाही

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :
Siddhi Naringrekar

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या. भारतीय जनता पार्टीचे दलाल यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरलेले आहेत. मला यासर्व गोष्टी करायच्या असता तर खूप आधी केल्या असत्या. परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असं विषय नाही. निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली. मी साहेबांच्या नेतृत्वाने काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे अशाप्रकारे एखादे पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं. फार काही महत्वाचं असतं असे मी मानत नाही. शिवसेना आणि भाजपाचं विचार सारखे होतेच. सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं आम्ही एक झालो का? आमची शिवसेनेची स्वतंत्र विचारसरणी आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे त्यामुळे महाराष्ट्रात मी स्वत: फिरणार सगळीकडे. चंद्रकांत खैरे आणि आमच्यात कोणतेही मतभेद नव्हते. त्यांनी तिकीट मागितलं होते मी तिकीट मागितलं होते एवढाच विषय. खैरे आमच्या पक्षाचं जेष्ठ नेते. आम्हा सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि आजही त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संभाजीनगरमध्ये काम करतो आहोत. महायुतीकडून मला कोणतीही ऑफर नाही. मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही.

महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही. उमेदवारी जाहीर होऊन पाच दिवस झालं आहेत. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. माझं फोनवर बोलणं झालेलं होते. शिवसेनेला 100 टक्के यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार. पक्षाकडे तिकीट मागणं गुन्हा नाही. मागितलं होते. खैरे साहेबांना दिलं. खैरे साहेब आमचं नेते आहेत. त्यांचं काम म्हणजे संघटनेचं काम करणं माझं कर्तव्य आहे. आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार. असे अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com