Girish Mahajan : मी पैसे घेऊन...महाजन यांच्या वक्तव्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त
थोडक्यात
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं
गिरीश महाजन म्हणाले मी पैसे घेऊन आलो नाही
महाजन यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे
अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत. मुसळधार पावसाने अनेक गावांचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तर आजपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. ते नुकसानीची पाहणी करत आहे. शेतकऱ्यांचं घरं, पीकं आणि जनावराचं मोठं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)काल धाराशिव दौऱ्यावर होते. त्यावेळी महाजन उशीरा पाहण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर यंत्रणा पंचनामे करत नसल्याने पण शेतकरी संतप्त आहेत. त्यात काही शेतकऱ्यांनी महाजनांचा ताफा अडवला. त्यातच महाजन यांच्या एका वक्तव्यावरून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरं वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडून धरला. गिरीश महाजन आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. महाजन यांच्या असंवेदनशीलतेवर विरोधकांनी टीका केली. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे निघाले.
संकट मोचक तरी व्हा
मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. तुम्ही जसे भाजप सरकारचे संकट मोचक झालात तसं शेतकऱ्याचं का होत येत नाही, असा सवाल कडू यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना विचारला. किमान चांगलं बोलता येत नसेल तर जावू नका न कोणी आग्रह केला, असा सवाल त्यांनी केला. देत तर काहीच नाही उलटून अशी भाषा करत असेल तर निषेध करतो असे बच्चू कडू म्हणाले.