‘मी उद्या पर्दाफाश करणार’, प्रवीण दरेकर यांचा मोठा इशारा, काय करणार खुलासा?

‘मी उद्या पर्दाफाश करणार’, प्रवीण दरेकर यांचा मोठा इशारा, काय करणार खुलासा?

राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल देण्यास सुरुवात केली आहे. फेक नरेटीव्ह कसा सेट केला जातो, त्याचा पर्दाफाश मी उद्या करणार आहे, असा इशारा भाजप आमदार प्रवीण दरेकर दिला केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल देण्यास सुरुवात केली आहे. फेक नरेटीव्ह कसा सेट केला जातो, त्याचा पर्दाफाश मी उद्या करणार आहे, असा इशारा भाजप आमदार प्रवीण दरेकर  दिला केला आहे. दरम्यान मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यावरुनच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

ते म्हणाले की, सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सहमत आहे. पण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या, या मागणीसोबत कुणीही राजकीय पक्ष सहमत नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे का? याबाबत भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस, उद्धव ठाकरे किंवा मविआने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी करावी” असं आवाहन प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

शरद पवार बोलत आहेत की, ओबीसींसाठी काम करणारे लक्ष्मण हाके आणि मराठा नेते मनोज जरांगे यांना घेऊन बैठक करावी. अशा बैठकीसाठी कुणीही विरोध करत नाही. जरांगे बोलतात, आम्ही बैठकीत येऊन काय करणार? एका व्यासपीठावर सर्वांनी येण्याची गरज आहे. यामुळे महाराष्ट्रासमोर स्पष्ट भूमिका येईल”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com