IAS Officer Transfer : राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Admin

IAS Officer Transfer : राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची छत्रपती संभाजी नगर राज्य कर विभागाचे सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी आणि पशूसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त सचिव पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.IAS अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. श्रवण हर्डिकर यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पी शिवशंकर यांच्याकडे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदारी देण्यात आली आहे. 

पी शिवशंकर, डीटी वाघमारे, श्रवण हर्डीकर, डॉ. अभिजीत चौधरी, नितीन करीर, राधीक रस्तोगी तुकाराम मुंढें, मिलिंद म्हैसकर, डॉ. संजीव कुमार, जी श्रीकांत या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com