RBI Governer | संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर; नेमके कोण आहेत? जाणून घ्या
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यानंतर संजय मल्होत्रा गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांद दास यांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर 2024 ला समाप्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता 1990 च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे IAS अधिकारी आहेत.
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे प्रशासकीय सेवेतील एक मोठं नाव आहेत. ते राजस्थान कॅडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय, त्यांनी अमेरिकेच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी देखील प्राप्त केली आहे.
संजय मल्होत्रा यांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत उत्तम नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सध्या, ते अर्थ मंत्रालयात महसूल विभागात सचिव म्हणून कार्यरत होते.
याआधी त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले आहे. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात ते ज्या पदावर आहे त्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.