महिलेवर बलात्कार करुन काेणी माेठेपणा मिरवत असेलत तर त्याला आमचा विराेध- विद्या चव्हाण
अमजद खान |कल्याण : कल्याण-बिलकीस बानू प्रकरणातील 11 गुन्हेगारांना सोडले आहे. त्यांना हार घालून मिठाई भरविली गेली. बिलकीस बानू ही मुस्लिम असलीत तरी ती आमची बहिण आहे. प्रत्येक स्त्रीचा धर्म हा तिचे चारित्र्य असते. त्यावर जण कुणी हल्ला केला तर तो कोणी असो कोणत्याही धर्म जातीचा असो. त्याच्या चारित्र्यावरील हल्ला आम्ही सहन करणार नाही. मर्दाने लढायचे असेल तर मैदानात यावे. महिलांवर बलात्कार करुन जर कोणी मोठेपणा मिरवत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी याच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या प्रदेश महिलाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी येथे सांगितले.
कल्याण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कार्यालयात महिला मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. काल विधीमंडळाच्या बाहेर दोन आमदारांमध्ये हाणामारी झाली. याविषयी प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले की, हे का होताना दिसतेय. तर पन्नास कोटीची लाच घेऊन आमदार गुहाटीला गेले.निवडून दिलेले आमदार हे लाच घेऊन सरकार पाडतात. त्याचबरोबर त्यातील एक आमदार काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओके हाय असे बोलून मोठा होतो. जसा काय त्याने फार मोठा पराक्रम केला आहे. त्या आमदाराने त्याच्या मतदार संघातील लोकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. सत्तेसाठी या मंडळांनी उद्धव ठाकरे यांच्या सारख्या चांगल्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवरुन खाली खेचले. महागाईस केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीची नवरात्रीनंतर देशव्यापी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन वर्षभर केले जाणार असून त्यामध्ये पक्षाच्या पेरेंट बॉडीने सक्रीय सहभाग घ्यावा.