Manoj Jarange Patil On OBC Mahamorcha : "जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू" मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
आज उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. याचपार्श्वभूमिवर मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे.
नागपूरचा मोर्चा ओबीसीचा नाही तर काँग्रेसचा आहे, राहुल गांधींच्या सांगण्यावरुन जीआर रद्द झाल्यास पुढचा डाव टाकू असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. "आपला पक्ष कसा वाढवायचा ओबीसींना कसं खेचायचं, तर मगं आपण मरांठ्यांच्या विरोधात बोंबल पाहिजे. मराठ्यांच आरक्षण कसं घालवायचं, याच्यासाठी मरण येईना म्हणून पाय खोडायचं काम चालू आहे राहुल गांधींच्या सांगण्यावरुन".
"त्यामुळे त्या पद्धतीने तो काँग्रेसचा मोर्चा आहे. ते काय ओबीसीसाठी नाही, ओबीसींच्या हक्कासाठी नाही, ओबीसींच कल्याण व्हाव म्हणून तर अजिबात नाही. जीआर रद्द होत नसतो आणि जर जीआर रद्द झाला तर आम्ही पण मग सांगतो. मग काय डाव टाकायचा ते आम्ही पण सांगतो. यांच्या षडयंत्रणाला आणि यांचे डाव पाडायला मी पक्का आहे".