How to take care of a car : उन्हाळ्यात कार सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' 3 चुका टाळा

How To Take Care Of a Car : कार सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' 3 चुका टाळा

कारच्या वायरिंगची काळजी घेऊन उन्हाळ्यात आग टाळा, योग्य तंत्रज्ञांकडूनच काम करून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

उन्हाळ्याच्या दिवसांत जशी आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, तशीच काळजी आपल्या कारचीही घेणे अत्यंत गरजेचे आहे. उष्णतेच्या प्रभावामुळे कारमध्ये बिघाड होण्याची अगदी आग लागण्याची शक्यता देखील असते. अनेकदा आपण अनावधानाने काही चुका करतो. ज्या कारसाठी अत्यंत घातक ठरतात. खाली अशाच तीन चुका आम्ही तुम्हाला या लेखात सांगितल्या आहेत, ज्या वेळीच सुधारल्या नाहीत, तर कार मोठ्या संकटात सापडू शकते.

१. वायरिंगमध्ये निष्काळजीपणा नको

कारची वायरिंग ही नाजूक असते आणि जर ती चुकीच्या पद्धतीने केली गेली किंवा स्थानिक, कमी दर्जाच्या वायरांचा वापर केला गेला, तर शॉर्टसर्किट होऊ शकतो. त्यामुळे कारमध्ये आग लागण्याचा धोका निर्माण होतो. वायरिंगचं काम नेहमी अनुभवी आणि प्रमाणित तंत्रज्ञांकडूनच करून घ्या. स्थानिक इलेक्ट्रिशियनकडून काम करून घेतल्यास दीर्घकालीन धोके संभवतात.

2. ज्वलनशील वस्तूंपासून सावध राहा

कारमध्ये अनेक जण अत्तर, डिओडरंट स्प्रे, गॅस कॅन इत्यादी ठेवतात, पण या वस्तू उष्णतेच्या संपर्कात आल्यास स्फोटक ठरू शकतात. त्याचप्रमाणे स्थानिक बनावटीच्या लाइट्स किंवा साउंड सिस्टम बसवताना योग्य वायरिंग नसेल, तर आग लागू शकते. म्हणूनच फक्त विश्वासार्ह अ‍ॅक्सेसरीज आणि उपकरणांचा वापर करा.

४. प्लास्टिक व पारदर्शक वस्तू कारमध्ये ठेवू नका

कारमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पारदर्शक पिशव्या किंवा लायटरसारख्या वस्तू ठेवण्यामुळे "लेंस इफेक्ट" तयार होतो, ज्यामुळे सूर्यकिरणांचा अपवर्तन होऊन आग लागू शकते. त्यामुळे या वस्तू कारमध्ये ठेवल्या जाणे टाळावे.

या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्यास तुमची कार सुरक्षित राहू शकते. थोडी खबरदारी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि जीवित संकटापासून वाचवू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com