घरात मांजर पाळायचे असेल तर आता घ्यावा लागणार परवाना

घरात मांजर पाळायचे असेल तर आता घ्यावा लागणार परवाना

घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे.

घरात मांजर पाळायचे असेल तर आता त्यासाठी पुणे महापालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र,आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती.

महापालिकेच्या माहितीनुसार शहरात १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत, पण आत्तापर्यंत केवळ ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे. नोंदणीसाठी नागरिकांच्या रहिवासी पुरावा, ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे. दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल. या नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. अनेक शेजारच्या घरात खूप मांजर पाळले आहेत, त्यांचा त्रास होतो. अशा अनेत तक्रारी देखिल समोर आल्या आहेत.

कशी करावी नोंदणी

१) मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे.

२) नोंदणीसाठी नागरिकांच्या रहिवासी पुरावा, ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे. ३) दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल.

४) नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com