सीएम पदासाठी तुमचं नाव आलं तर..; राहुल नार्वेकर म्हणाले...
लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.
लोकशाही संवाद या कार्यक्रमाच्या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना सीएम पदासाठी तुमचं नाव आलं तर...? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल नार्वेकर म्हणाले की, मला वाटतं आमच्या पक्षात अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ नेते आहेत जे वयाने अत्यंत कमी आहेत आणि त्यांनी माझ्यापेक्षा दसपट चांगली जबाबदारी पार पाडली आहे. तर असा काय माझ्या ध्यानी मनी कुठचाही मानस नाही. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सगळेच स्वीकारतात पण मला वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मला वाटतं मला अजून खूप काही शिकायचं आहे आणि मला अजून खूप सारा प्रवास पार पाडायचा आहे त्यामुळे मला अशा कुठच्याही पदाची घाई अथवा इच्छा तुर्तास नाही आहे आणि माझ्यासाठी जी जबाबदारी खरंतर विधानसबा अध्यक्षांची जबाबदारी ही विधानसभा सदस्यांनी दिलेली असते.
ज्या विधानसभेने माझ्यावर विश्वास ठेवून कमी वयात मला ही जबाबदारी दिली त्या विधानसभेचा कुठेही विश्वास तोडला जाणार नाही. विश्वासाबरोबर कुठलीही तडजोड केली नाही हे माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे. पण आपण बघितलं असेल की या सगळ्या घडामोडी ज्याचा आपण उल्लेख केला त्या केवळ घडल्या नाहीयेत त्या घडवून आणल्या गेल्या आहेत. 24 वर्षानंतर मी मुंबईत तो घ्यावा, महाराष्ट्रात तो घ्यावा म्हणून ओम बिरला साहेबांकडे वारंवार विनंती करुन त्यांना विश्वास दिला की कमी वेळात का होईना आम्ही हा चांगला पार पाडू.