Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

IMD Weather Update : पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट,महाराष्ट्रात काय स्थिती?

भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट,

  • हाय अलर्ट जारी, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी अपडेट

  • काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असून, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे.

या वर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पावसानं चांगलंच झोडपून काढलं, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पावसाचा मोठा तडाखा महाराष्ट्राला तर बसला, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. शेतकरी खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे हवालदिल झाले. दरम्यान पावसाचं संकट आता टळलं आहे, असं वाटत असतानाच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, चिंता त्यामुळे वाढली आहे. दक्षिण श्रीलंका आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा एअर सायक्लोनिक सर्कुलेशन (Cyclonic Circulation) तयार झालं आहे. कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम म्हणजे निर्माण झाला आहे. आता हळुहळु हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम उत्तर दिशेकडे सरकत आहे, पुन्हा एकदा जोरदार पवासाचा अंदाज त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये भारतीय हवामान विभाग (IMD) कडून वर्तवण्यात आला आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात सध्या पावसाला अनुकूल असं वातावरण निर्माण झालं असून, याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे, तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस आंध्रप्रदेश, लक्षद्वीप आणि आंदमार निकोबार बेटावर देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यताया काळात तामिळनाडूसोबत केरळ आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांमध्ये आहे. हवेचा वेग प्रतितास 50 किमी इतका या काळात राहण्याचा अंदाज असून हवामान खात्याकडून या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

दरम्यान दुसरीकडे मात्र दक्षिण भारत वगळता थंडीचा कडका इतर राज्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात कडक्याची थंडी पडू शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com