महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा त्वरित करा; हिंदु जनजागृती समिती यांची मागणी

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा त्वरित करा; हिंदु जनजागृती समिती यांची मागणी

श्रद्धा वालकरची हत्या करणार्‍या आफताबला फासावर लटकवण्याची मागणी
Published by :
shweta walge

प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग : ‘लव्ह जिहादी’ नराधम आफताब याने श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीची ३५ तुकडे करून हत्या केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या धर्मांध वृत्तीचा निषेध ठिकठिकाणी केला जात आहे. कुडाळ शहरातील जिजामाता चौक येथेही १८ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीसहित अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले.

‘लव्ह जिहादी’ नराधम आफताब याला तत्काळ फासावर लटकवावे या मागणीसह ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थ पुरवठा, महिला आणि हिंदु युवतींची तस्करी अन् त्यांचा आतंकवादी कारवाऱ्यांसाठी होणारा वापर याची शासनाने चौकशी करून त्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी. राज्यात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ बंदी कायदा लागू करावा, अशा विविध मागण्यांसाठी कुडाळ जिजामाता चौक येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आले. तसेच या तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सौ. अंजली वालावलकर, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. संध्या तेरसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. मिलिंद देसाई, भाजपचे श्री. अविनाश पराडकर, विश्व हिंदू परिषदेचे श्री. विष्णू खोबरेकर, शिवप्रेमी संघटनेचे श्री. दैवेश रेडकर आणि श्री. रमाकांत नाईक, सर्वश्री प्रसाद नातू, जीवन बांदेकर, गणेश भोगटे, गुरुदास प्रभू, यशवंत भालेकर, केशव माडये, सचिन गावडे, किशोर सरनोबत, राज वारंग, साईप्रसाद मसगे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंद नाईक, राजेंद्र पाटील, संजय गावडे, रणरागिणी शाखेच्या सौ. सिमा पै, कु. पूजा धुरी, सौ. मंजुषा खाडये यांच्यासह राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा त्वरित करा; हिंदु जनजागृती समिती यांची मागणी
Shraddha Murder case: आफताबची कबुली! मृतदेह कापून कंटाळून त्याने जेवण ऑर्डर केले, बिअर, वेबसीरीज आणि...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com