पुण्यात पारंपरिक पद्धतीने मानाच्या बाप्पांना निरोप
Admin

पुण्यात पारंपरिक पद्धतीने मानाच्या बाप्पांना निरोप

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. पुण्यात बाप्पांना पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने निरोप देण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. पुण्यात बाप्पांना पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने निरोप देण्यात आला. तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली.कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रीची विलोभनीय मुर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती.

पुण्याचा राजा आणि गुलालाची मुक्त उधळण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मार्गस्थ झाला. गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक भक्तिरथातून काढण्यात आली. श्री गजमुख रथात मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची मिरवणूक निघाली. रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला.

सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय वातावरणात मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com