बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं. यंदा उशिरा दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली. दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु होण्यास दुसरा दिवस उजाडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला पांचाळेश्वर घाटावर निरोप देण्यात आला. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन पार पडलं. भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आलेले श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघाली होती.

Lokshahi
www.lokshahi.com