Workplace Selection : कामाची जागा निवडण्याबाबत 'घ्या' खबरदारी; जागाही ठरते परिणामकारक

Workplace Selection : कामाची जागा निवडण्याबाबत 'घ्या' खबरदारी; जागाही ठरते परिणामकारक

आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो. त्याचे कळत नकळत परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यात होत असतात.
Published by :
Team Lokshahi
Published on

आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी करत असतो. त्याचे कळत नकळत परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यात होत असतात. त्यातील आपल्या आयुष्यावर होणारे परिणाम हे बऱ्याचदा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे असतात, तर अनेकदा त्या गोष्टींचा नकारात्मक प्रभावही आपल्या आयुष्यावर होत असतो.

या परिणामांवरच आपले रोजचे व्यवहार सुरळीतपणे चालत असतात. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या पूर्ण दिवसांमधील जवळपास १२ ते १३ तास आपल्या कामाच्या ठिकाणी घालवत असतो. तिथे बसून काम करताना येणारे वाइब्स हे आपला रोजचा मूड ठरवत असतात.

आपल्या कामाची जागा निवडण्याबद्दल थोडीशी काळजी घेतली तर हा सकारात्मक बदल नक्कीच तुमच्यामध्येही होऊ शकतो.

ही घ्या काळजी

१) कामासाठी अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणाहून ऑफिसचा मुख्य दरवाजा दूर असेल. जर तुम्ही मुख्य दरवाजासमोर बसत असाल तर ते तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकते. तसेच ऑफिसमधील तुमचे चांगले मित्र-मैत्रिणीही तुमच्यापासून दूर होऊ शकतात.

२) तुमची काम करण्याची जागा ही कॉरिडॉरमध्ये नसावी. असे असल्यास तुमच्या कामामध्ये बाधा येऊ शकते. तुमच्या प्रगतीचे मार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतात.

३) तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना कोणत्या दिशेला बसताय हे पण तितकेच महत्वाचे आहे. वास्तूशास्त्रानुसार उत्तर किंवा पूर्व दिशेला बसणे हे अतिशय उत्तम मानले जाते. वॉशरूम किंवा ऑफिसच्या पायऱ्या असलेल्या ठिकाणी जर तुमचे कामाचे डेस्क असेल तर ते सकारात्मक ऊर्जेला बाधा आणते. त्यामुळे ऑफिसमध्ये कामाचे ठिकाण हे योग्य पद्धतीने निवडा.

आपण आपल्या पूर्ण दिवसातील जे काही १२ ते १३ तास आपल्या कामाच्या ठिकाणी घालवतो त्या वेळेमध्ये जर काम करताना सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अर्थात पॉसिटीव्ह वाइब्स निर्माण झाल्या तर निश्चितच आपल्या स्वभावामध्येसुद्धा तीच सकारात्मकता येते. आपला पूर्ण दिवस आनंदात जातो. त्यामुळे आपण जिथे काम करतो ते ठिकाण निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होतो.

हेही वाचा

Workplace Selection : कामाची जागा निवडण्याबाबत 'घ्या' खबरदारी; जागाही ठरते परिणामकारक
Viral Video : 'टेंशन आहे म्हणून प्यायलो..., आमचं कुणी काही करू शकत नाही...'; मद्यधुंद अवस्थेतील तरुणी पब्लिकमध्ये बरळल्या
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com