Viral Video : 'टेंशन आहे म्हणून प्यायलो..., आमचं कुणी काही करू शकत नाही...'; मद्यधुंद अवस्थेतील तरुणी पब्लिकमध्ये बरळल्या

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळुज परिसरातील महावीर चौकात शनिवारी रात्री 9 वाजता दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यावर अक्षरशः धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळुज परिसरातील महावीर चौकात शनिवारी रात्री 9 वाजता दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यावर अक्षरशः धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी त्रास दिला. विशेष म्हणजे, “भाऊ डॉन आहे, तो मर्डर करतो, आम्हाला पोलिसही काही करू शकत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी उघडपणे धमकी दिली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तरुणी वारंवार ‘आम्ही मोठ्या घरातून आलोय, टेन्शनमुळे दारू प्यायलीय’, अशी कारणं देत, सार्वजनिक ठिकाणी अरेरावी करत होत्या. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उलट नागरिकांनाच शिवीगाळ सुरू ठेवली.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ आणि भीतीचं वातावरण पसरलं. स्थानिक नागरिकांनी तातडीने वाळुज पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या दोन्ही तरुणींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे.

याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि घटनास्थळी जमा झालेल्या माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर पावलं उचलत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा

Viral Video : 'टेंशन आहे म्हणून प्यायलो..., आमचं कुणी काही करू शकत नाही...'; मद्यधुंद अवस्थेतील तरुणी पब्लिकमध्ये बरळल्या
Air India Flight : 171 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! विमानाला हादरा बसला अन् अचानक बॅगा खाली पडल्या, जाणून घ्या काय घडलं...
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com