मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय, दुसऱ्या सत्रातही शाळा आणि महाविद्यालये राहणार बंद

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय, दुसऱ्या सत्रातही शाळा आणि महाविद्यालये राहणार बंद

मुंबई महानगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे.
Published by :
shweta walge

मुंबई महानगरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊन सुरु आहे. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य व हार्बर रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दुसर्‍या सत्रातही शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

याआधी केवळ पहिल्या सत्रातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता दुसऱ्या सत्रालाही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com