PM Narendra Modi On Budget 2023
PM Narendra Modi On Budget 2023Team Lokshahi

उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधानांची महत्वाची माहिती; म्हणाले, आशा, आकांक्षा...

निर्मला सीतारामन या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे. संपूर्ण जग भारताकडे ज्या दृष्टीकोनाने पाहत आहे ते आम्ही पूर्ण करू.

उद्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडला जाणार आहे. तर आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. उद्या सादर होणाऱ्या या बजेटवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. त्यातच अधिवेशनाच्या सुरुवतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी आज मोठी माहिती दिली आहे. अधिवेशनापूर्वी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

PM Narendra Modi On Budget 2023
'त्या' वक्तव्यावरून अजित पवार धीरेंद्र शास्त्रींवर संतापले; म्हणाले, मी त्यामुळे व्यथित...

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आज जगात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये सर्वांच्या नजरा भारताच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. त्यांनी म्हटले की मला आशा आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अपेक्षा पूर्ण करतील. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सर्वसामान्यांना काही दिलासा देण्याची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये, भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, जगाला दिसणारा आशेचा किरण अधिक उजळत आहे. यासाठी निर्मला सीतारामन या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे. संपूर्ण जग भारताकडे ज्या दृष्टीकोनाने पाहत आहे ते आम्ही पूर्ण करू. असे पंतप्रधान म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, आजपासून नागरिकांच्या आशा आणि आकांक्षाअर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आणि ज्याचा आवाज ओळखला जातो, तो आवाज आशेचा संदेश घेऊन येत आहे. उत्साहाची नांदी घेऊन येत आहे. आज एक महत्त्वाचा प्रसंग आहे. भारताचा अर्थसंकल्प सामान्य लोकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना, जगाला प्रकाश देईल. जे भारताकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. अशाप्रकारे यंदाचा अर्थसंकल्प लोकप्रिय ठरू शकतो. असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com