दिल्लीत आज एनडीएची महत्त्वाची बैठक

दिल्लीत आज एनडीएची महत्त्वाची बैठक

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर आघाडी घेतली तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत आज एनडीएची महत्त्त्वाची बैठक पार पडणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. चार वाजता बैठक होणार आहे. बैठकीला एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच एनडीएचा नवीन संयोजक कोण असणार यावर देखील बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com