ताज्या बातम्या
Cabinet Meeting : मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्यमंत्री मंडळाची महत्त्वाची आज बैठक
आज दुपारी 12.00 वाजता राज्यमंत्री मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावरील त्यांच्या या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आठपैंकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपले उपोषण सोडले. दरम्यान सीएसएमटी परिसरात आंदोलकांमध्ये जल्लोषात वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी 12.00 वाजता राज्यमंत्री मंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.