PM Modi On Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्त्वाची बैठक

गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीची माहिती घेतली. दिल्ली स्फोट प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्त्वाची बैठक पार पडली जाणार आहे.
Published by :
Prachi Nate

दिल्लीतील स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचसोबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीची माहिती घेतली. दिल्ली स्फोट प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्त्वाची बैठक पार पडली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भूतानमध्ये असून उद्या दिल्लीत स्फोट प्रकरणी महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानमध्ये बोलताना दिल्ली स्फोटावर प्रतिक्रीया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या प्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या कटासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com