Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची पत्रकार परिषद; काय भूमिका घेणार?

आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित मविआसोबत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वंचितला चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर सकाळी 11 वाजता भूमिका जाहीर करणार आहेत. यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com