Imran Khan : 12 तासांनंतरही होऊ शकली नाही इम्रान खान यांना अटक; समर्थकांची हिंसक निदर्शने
Admin

Imran Khan : 12 तासांनंतरही होऊ शकली नाही इम्रान खान यांना अटक; समर्थकांची हिंसक निदर्शने

गेल्या आठ दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

गेल्या आठ दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात सापडलाय. महागाई काही केल्या कमी होताना दिसत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखान प्रकरणात आपली अटक टळावी म्हणून प्रयत्न करत आहेत.

इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यात कमी किमतीत भेटवस्तू तत्कालीन पंतप्रधान म्हणून मिळालेल्या महागड्या घड्याळासह खरेदी केल्याचा आणि नंतर नफा कमावण्यासाठी विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न 17 तासांपासून सुरू आहेत. तोशाखाना प्रकरणात त्यांना अटक करण्यासाठी मंगळवारी पाकिस्तान पोलीस लाहोरच्या जमान पार्कमध्ये पोहोचले, जिथे इम्रान खान यांचे घर आहे.

पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच इम्रान यांच्या पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने सुरू केली. पोलिसांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्बही फेकले. हाणामारीत समर्थक जखमी झाले आहेत. यात लाहोरचे पोलीस आयुक्त आणि इस्लामाबादचे डीआयजीही जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी जमान पार्कमध्ये अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. मदतीसाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत अटक करण्याचे आदेश दिले होते. इम्रानने 18 मार्चपर्यंत संरक्षणात्मक जामीन घेतला आहे, मात्र पोलीस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.तोशाखाना प्रकरणात एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याबद्दल आणि कोर्टात हजर न राहिल्याबद्दल इम्रान खानविरोधात दोन अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. पोलीस हेलिकॉप्टरमधून इम्रानला अटक करण्यासाठी पोहोचले होते. पण अत्यंत हुशारीने इम्रानने घरही सोडले आणि थेट रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले. समर्थकांच्या गर्दीत इम्रानला पकडणे पोलिसांना अवघड झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com