खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पडला पैशांचा पाऊस, कव्वालीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पडला पैशांचा पाऊस, कव्वालीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा पैशांची उधळण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा पैशांची उधळण झाली आहे. औरंगाबाद आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांचा पाऊस पडत होता. याचाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न शहरातील एका प्रसिद्ध लॉ मध्ये झालं होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी आलेले जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता

खासदार जलील यांच्याकडून आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहे. दरम्यान शुक्रवारी याच आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र कव्वाली सुरू होताच जलील यांच्या समर्थकांकडून जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com