ताज्या बातम्या
Bhandup MNS Rada : कपाळावरील टीळा पुसायला लावला! अन् मनसेचा भडका उडाला, थेट क्रोमा शोरूममध्ये घुसून...
मुंबईतील भांडूप येथील क्रोमा शोरूममध्ये एका कर्मचाऱ्याला कपाळावरील टीळा पुसायला लावल्यामुळे मनसैनिकांनी क्रोमा शोरूममध्ये घुसून गोंधळ घातला.
मनसैनिकांना अनेक वेळा मराठी माणसाच्या हक्कासाठी गोंधळ घालताना पाहायला मिळालं आहे. मुंबईत मागील काही दिवसांमध्ये मराठी माणसावर आणि त्याच्या भाषेवर विरोध केल्याचे प्रकार घडले.
ज्याला मनसैनिकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. अशातच आता मुंबईतील भांडूप येथील क्रोमा शोरूममध्ये एका कर्मचाऱ्याने कपाळावर टीळा लावल्यामुळे आत जाण्यास रोखण्यात आलं.
हा घडलेला प्रकार मनसैनिकांना कळताच त्यांनी त्या क्रोमा शोरूममध्ये धाड टाकली. तसेच क्रोमा स्टोअरमध्ये मनसैनिकांनी गोंधळ घातला आणि तेथील मालकाने संबंधित कर्मचाऱ्याची माफी मागितल्यानंतर मनसैनिक तिथून निघून गेले.