ताज्या बातम्या
Narayan Rane : "जे कामं करतील, त्यांनाच पद मिळेल" नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
देवरुखमध्ये खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार पार पडला. जनता दरबारानंतर नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
देवरुखमध्ये खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार पार पडला. जनता दरबारानंतर नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं की, "निवडणुका येतील जातील काम करतील त्यालाच पदं मिळतील. कामाला लागा, मी अडचणी सोडवण्यासाठी आहे".
"भारतीय जनता पक्ष आणि आपले मित्र पक्ष यांच्यात काही वैर नाही. युतीबाबत वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, याबाबत चर्चा नको, वाद नको... आपापसात राजकारण दिसलं तर त्या लोकांना मी निवडणुकीतून बाद करीन.." जनता दरबारानंतर भाषणातून नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना इशार दिला आहे. तसेच आपल्या कार्यकर्त्यांबरोबर स्नेह जोडा, असा सल्ला नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
