Mumbai Crime : आधी शेजाऱ्यांनी, मग जन्मदात्यासह दोन भावांनी केला अत्याचार; 'त्या' अल्पवयीन मुलीची व्यथा थरकाप उडवणारी
मुंबईतील मुलुंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या चार जणांनी अत्याचार केल्यानंतर तिच्याच वडिलांनी व दोन भावांनीही बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी बाल कल्याण समितीच्या ताब्यात असताना ही माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि एका भावाला अटक केली असून तिचा दुसरा भाऊ आणि अन्य एक इसम फरार असल्याचे समजते. पीडितेवर 2024 मध्ये झालेल्या बलात्काराची माहिती तिच्या कुटुंबाला होती. मात्र त्यांनी तिला धीर देण्याऐवजी तिचाच गैरफायदा घेतला. तिचे 42 वर्षांचे वडील आणि 16 व 17 वर्षांच्या भावाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तर याच परिसरातील एका 50वर्षीय व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस अटक केलेल्या वडील व भावाकडून इतर माहिती घेत असून फरार दोघांचा शोध सुरू आहे.