BJP Vs Shivsena : भाजपला शिवसेनेकडून मोठा धक्का! ठाकरे अन् शिंदेंच्या गटात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू

आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे. अशातच नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Prachi Nate

आगामी नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे. अशातच भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाडआणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले हे इनकमिंग शिवसेना ठाकरेसेनेसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. भाजपमध्ये महिलांची गळचेपी होत आहे. महिलांनी पक्षासाठी काम केलं तरी डावालल जात आहे. महिलांना पाहिजे तसे पद दिले जात आहे.

त्यामुळे आज शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. तसेच तुमसर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भूरे यांनी पक्षप्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गट आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून येणार आहे. तर भाजप महिला आघाडीमध्ये नाराजी सूर उमटत असला तरी भाजप महिला आता बॅकफूटवर आल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com