Pune Police News : पुण्यात अजब प्रकार! हवालदारानेच केले पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप अन् चिठ्ठीतून केला खुलासा
पुणे इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर पोलीस हवालदाराने गंभीर आरोप केल्यानंतर गायब झाले आहेत. विष्णू केमदारणे या हवालदाराने चिठ्ठी लिहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विष्णू हे मंगळवारी पहाटेपासून आपल्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले असून त्यांनी लिहिलेली चिठ्ठी आता समोर आली आहे.
"वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी, तुझी नोकरी आणि यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे", असे या चिठ्ठी हवालदार विष्णू केम दारणे यांनी लिहिली आहे. कोकणे यांच्यासोबतच तेथील इतर हवालदार सूर्यवंशी आणि हवालदार रासकर यांच्यावरही बेपत्ता असलेले विष्णू केमदारणे यांनी अनेक आरोप केले आहेत. अशा पद्धतीने गंभीर आरोप करत एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास दिल्या प्रकरणी पोलीस दलात खळबळ उडाली आहे.