ठाण्यात गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासह वाहनांवर झाड कोसळलं, 5 जण जखमी

ठाण्यात गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासह वाहनांवर झाड कोसळलं, 5 जण जखमी

गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावरच भलामोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. काही गाड्यादेखील या झाडाखाली दबल्या गेल्या. तर यात पाच जण जखमी झाले आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावरच भलामोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. काही गाड्यादेखील या झाडाखाली दबल्या गेल्या. तर यात पाच जण जखमी झाले आहे.

कोलबाड, जाग माता मंदिर, ठाणे पश्चिम इथं हे झाड पडलं होतं. सार्वजनिक मंडप आणि दोन पार्क केलेल्या गाड्यावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान यात झालं. एकूण पाच जण यात जखमी झालेत. त्यांना दोघांना जबर मार लागलाय. उपचारासाठी गंभीर जखमींनी रुग्णालयात दाखलही करण्यात आलंय.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, तसंच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आलं.

ठाण्यात गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासह वाहनांवर झाड कोसळलं, 5 जण जखमी
पनवेलमध्ये विसर्जन घाटावर ११ भाविकांना विजेचा झटका
Lokshahi
www.lokshahi.com