Abhijit Bichukale
Abhijit Bichukale Abhijit Bichukale

Abhijit Bichukale : 'बिग बॉस फेम' अभिजीत बिचुकले पुन्हा राजकारणात, साताऱ्यात 'या' पदासाठी भरला उमेदवारी अर्ज

'बिग बॉस फेम' आणि 'कवी मनाचे नेते' म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

'बिग बॉस फेम' आणि 'कवी मनाचे नेते' म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. राज्यात 246 नगरपरिषद आणि 42 नगर पंचायतांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे.

साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी अर्ज

साताऱ्याच्या नगराध्यक्षपदासाठी बिचुकले यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करताच त्यांनी स्थानिक समस्यांविषयी आपली प्रतिक्रिया दिली. "साताऱ्यात 25 वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, आणि बागांची स्थिती पाहतोय. मला साताऱ्याला 'सितारा' बनवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तयार करायचं आहे," असं त्यांनी सांगितलं. बिचुकले यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचारावरही जोरदार टीका केली, "मी माझ्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या प्रचारासाठी काम करत होतो. त्या वेळेस काही लोकांनी स्वार्थासाठी मला नोकरीवरून काढलं. सातारा नगरपालिकेतील सगळी 'अली-पिली' बाहेर काढायची आहे," असं ते म्हणाले.

निवडणुकीचा कार्यक्रम

नगरपरिषद आणि नगर पंचायतांच्या निवडणुकीची अंतिम प्रक्रिया सुरु आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे, आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे. 25 नोव्हेंबरला निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. अभिजीत बिचुकले यांच्या या उमेदवारीच्या माध्यमातून साताऱ्यातील राजकीय वर्तुळात एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात

  • 'बिग बॉस फेम' आणि 'कवी मनाचे नेते' म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत.

  • नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिचुकले यांनी साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

  • यासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com