Ajit Pawar : 'युती होईल किंवा नाही याचा विचार...'; पुण्यातील बैठकीत अजित पवार यांचा इशारा

Ajit Pawar : 'युती होईल किंवा नाही याचा विचार...'; पुण्यातील बैठकीत अजित पवार यांचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील दौऱ्यावर होते. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माजी पदाधिकारी व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
Published by :
Prachi Nate
Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील दौऱ्यावर होते. आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माजी पदाधिकारी व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत "युती होईल का नाही, याचा विचार करू नका, कामाला लागा असे पवार यांनी सांगितले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढेल का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बैठकीत त्यांनी नगरसेवकांना इशारा देत म्हटले की, "प्रभाग रचनेवरून वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका, सरळ कामाला लागा". त्यांनी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तळागाळात पोहोचण्यावर भर दिला.

यावेळी रूपाली ठोंबरे यांनीही पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अजित पवार यांचा भर हा प्रभाग रचनेवर अडकून न राहता "महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकविण्यावर" आहे. त्यासाठी प्रत्येक विभागात सक्रिय होऊन संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, "जे नगरसेवक आमदारकीसाठी इच्छुक होते, त्यांनी देखील आपल्या गटांमध्ये लक्ष देऊन लगेचच कामाला सुरुवात केली पाहिजे". पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना, अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com