गणेशोत्सव मिरवणुकीत भाजपाचेच दोन गट आपापसांत भिडले
Admin

गणेशोत्सव मिरवणुकीत भाजपाचेच दोन गट आपापसांत भिडले

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. राज्यभरात लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप दिला जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. राज्यभरात लाडक्या बाप्पाला उत्साहात निरोप दिला जात आहे.

मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात बाप्पांच्या विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मात्र, या उत्साहात वाद देखिल घडला. दिंडोशीमध्ये असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचेच दोन गट आमनेसामेन आले. पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.

भाजपा आमदार राजहंस सिंह आणि भाजपा पूर्व नगरसेवक विनोद मिश्रा यांचे कार्यकर्ते एकमेकांशीच भिडले. या दोन्ही गटांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादावादी सुरू झाली. हे दोन्ही गट आमने-सामने भिडले. वाद नेमका कशामुळे झाला. याची माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com