Bharat Taxi : येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार, अमित शाह यांची मोठी घोषणा
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Bharat Taxi) येत्या एक-दोन महिन्यात संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली आहे. हरियाणा येथील पंचकुला येथे आयोजित सहकार संमेलनात बोलताना अमित शाह यांनी यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
आता संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सहकारी तत्वावर आधारित अशी भारत टॅक्सीची सेवा असणार आहे. 'सध्या ज्या कंपन्या टॅक्सीचं काम करतात त्यात नफा मालकांकडे जातो.
मात्र, भारत टॅक्सीची सर्व रक्कम आमच्या चालकांच्या खिशात जाईल.यासोबतच 'खासगी कंपन्या जिथं 20-30 टक्के कमिशन घेतात तिथं भारत टॅक्सी वाहन चालकांकडून कोणतंही कमिशन घेणार नाही' असे अमित शाह म्हणाले. भारत टॅक्सी सेवा प्रायोगित तत्त्वावर दिल्ली आणि गुजरातच्या राजकोटमध्ये सुरु झाली आहे.
Summary
आता संपूर्ण देशात भारत टॅक्सी सेवा सुरु करणार
येत्या एक-दोन महिन्यात सेवा सुरु करणार
केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा
