Turkey EarthquakeTeam Lokshahi
बातम्या
Video : तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात, पत्त्यांसारखी कोसळली इमारत
तुर्कीमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नवी दिल्ली : तुर्कीमध्ये सोमवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत तीन भूकंपाचे धक्के बसले असून तीव्रता 7.8 एवढी होती. या भूकंपाचे वर्णन तुर्कीच्या इतिहासातील दुसरा सर्वात भीषण भूकंप म्हणून केला जात आहे. तुर्कीच्या विविध भागात भूकंपामुळे झालेल्या नुकसानीनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या सगळ्यामध्ये तुर्कीमध्ये भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे एक बहुमजली इमारत कशी कोसळली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.