Ulhasnagar Crime : तरुणाला विचारला 'तो' प्रश्न अन् नंतर थेट पोटात भोसकला चाकू

उल्हासनगर गुन्हा: बहिणीसोबत बोलल्याने तरुणाला चाकू भोसकला, गुन्हा दाखल
Published by :
Riddhi Vanne

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माझ्या बहिणीसोबत का उभा आहेस?असं विचारल्याने रागाच्या भरात तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे. कॅम्प नंबर तीनच्या कवलराम चौकात मुजबिल या तरुणाची बहीण करण आणि सूर्या या दोघांशी बोलत उभी होती,यावेळी मुजबिलने सूर्याला तू माझ्या बहिणीशी का बोलत आहेस असं विचारलं. याचा राग सूर्याला आल्याने सूर्याने स्वतः जवळ असलेला चाकू मुजबिलच्या पोटात भोसकला आणि तिथून पसार झाला, यात मुजबिलच्या पोटात गंभीर जखम झाली असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com