Picnic Spots In Lonavala : पावसाळ्यात लोणावळ्याला फिरण्याचा प्लॅन करतायं; पाहून घ्या कोणकोणत्या ठिकाणांवर आहे पर्यटकांना 'नो एंट्री'

लोणावळ्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेत पर्यटकांना अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळी प्रवेशास बंदी घातली आहे.
Published by :
Team Lokshahi

लोणावळ्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेत पर्यटकांना अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळी प्रवेशास बंदी घातली आहे. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत येथे कलम 163 लागू करण्यात आलं आहे. मागील वर्षी पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे, जसं की एका कुटुंबाच्या वाहून जाण्याची घटना, त्यानंतर ही खबरदारी घेण्यात आली आहे.

या बंदीच्या निर्णयात एकवीरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी व भाजे धबधबा, लोहगड, विसापूर व तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना डॅम व लायन्स पॉईंट यांचा समावेश आहे. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

दरम्यान, भुशी डॅम मात्र यामधून वगळण्यात आलेला असून, पर्यटकांना डॅमच्या पायऱ्यांवर भिजण्याचा अनुभव घेण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रशासनाने पर्यटकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा

Picnic Spots In Lonavala : पावसाळ्यात लोणावळ्याला फिरण्याचा प्लॅन करतायं; पाहून घ्या कोणकोणत्या ठिकाणांवर आहे पर्यटकांना 'नो एंट्री'
TasteAtlas Top 50 Breakfasts : महाराष्ट्राची मिसळ जगात भारी; 'टॉप 50 ब्रेकफास्ट'च्या यादीत मिळवले स्थान
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com