ताज्या बातम्या
नागपूरमध्ये मजुराला आयकर विभागाकडून तब्बल 314 कोटींची नोटीस
नागपूरमध्ये मजुराला आयकर विभागाकडून तब्बल 314 कोटींची नोटीस आल्याची माहिती मिळत आहे.
नागपूरमध्ये मजुराला आयकर विभागाकडून तब्बल 314 कोटींची नोटीस आल्याची माहिती मिळत आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून नोटीस तब्बल 314 कोटी 79 लाख 87 हजार 83रुपयांची नोटीस मिळाली आहे.
या मजुराचे नाव चंद्रशेखर पंडित राव कोहाड असे असून चंद्रशेखर हा मूळचा मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथे मजुरी करत आहे.
आयकर विभागाने कोट्यावधी रुपयांची नोटीस पाठवल्याने मजूर आजारी पडला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. ही नोटीस पाहून त्याचा कुटुंबाला धक्का बसला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मजुराने केली आहे.