Mumbai Coronavirus : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे देणार इन्कोव्हॅक लस
Admin

Mumbai Coronavirus : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून नाकावाटे देणार इन्कोव्हॅक लस

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे. कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक ही नाकावाटे लस दिली जाणार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यात येणार आहे.

इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे.मुंबई महनगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे.ही लस 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना घेण्यात येणार आहे. कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन या पैकी कोणत्याही लसीचे दोन डोस पूर्ण झाले असतील तर लस घेता येणार आहे. या लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com