Ind vs Eng 1st Test Match : पहिल्या डावात भारतीय संघाची लीड; इंग्लंडचा संघ 465 धावांत गारद

Ind vs Eng 1st Test Match : पहिल्या डावात भारतीय संघाची लीड; इंग्लंडचा संघ 465 धावांत गारद

लीड्समधील हेडिंग्ले येथे भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर संपला.
Published by :
Rashmi Mane
Published on

लीड्समधील हेडिंग्ले येथे भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर संपला. यासह, भारतीय संघाने पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून शानदार फलंदाजी करताना ऑली पोपने 106 धावा केल्या. याशिवाय हॅरी ब्रुकने 99 धावा आणि बेन डकेटने 62 धावा केल्या. खालच्या फळीत जेमी स्मिथने 40 धावा आणि ख्रिस वोक्सने 38 धावा केल्या. भारताकडून शानदार गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. त्याआधी, फलंदाजीसाठी आमंत्रित झाल्यानंतर भारतीय संघाने 471 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये कर्णधार शुभमन गिलने 147 धावा, ऋषभ पंतने 134 धावा आणि यशस्वी जयस्वालने 101 धावा केल्या.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा यॉर्करकिंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्यात पहिला दिवस टीम इंडियाच्या फलंदाजांनी गाजवलेला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा करत कमबॅक केलं. यावेळी बुमराहच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये झॅक क्रॉली अवघ्या 4 धावांवर माघारी परतवलं. बेन डकेट आणि ऑली पोप यांच्यानंतर 28 व्या ओव्हरमध्ये बुमराहने टीम इंडियाला ब्रेकथ्रू दिला आणि डकेटला 62 धावांवर बाद केले. यावेळी बुमराहने टीम इंडियासाठी तिन्ही विकेट घेतल्या.

हेही वाचा

Ind vs Eng 1st Test Match : पहिल्या डावात भारतीय संघाची लीड; इंग्लंडचा संघ 465 धावांत गारद
Virat Kohli-Genelia : विराट कोहली–जिनिलियाची 'ती' जाहिरात रातोरात काढली; कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का!
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com