Virat Kohli-Genelia : विराट कोहली–जिनिलियाची 'ती' जाहिरात रातोरात काढली
Virat Kohli-Genelia : विराट कोहली–जिनिलियाची 'ती' जाहिरात रातोरात काढलीVirat Kohli-Genelia : विराट कोहली–जिनिलियाची 'ती' जाहिरात रातोरात काढली

Virat Kohli-Genelia : विराट कोहली–जिनिलियाची 'ती' जाहिरात रातोरात काढली; कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का!

विराट-जेनेलिया जाहिरात वाद: विमानातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर आधारित जाहिरात का झाली बॅन?
Published by :
Riddhi Vanne
Published on

Virat Kohli and Genelia Dsouza controversial advertisement : क्रिकेट स्टार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजा यांची एक जाहिरात सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, जी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित होताच बंद करण्यात आली होती. कारण एवढं गंभीर होतं की जाहिरात रातोरात टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवावी लागली. वास्तविक, विराट कोहलीने एका जुन्या मुलाखतीत स्वीकारले होते की जिनिलिया ही त्याची एकेकाळची क्रश होती. त्यानंतर त्याचे लग्न अभिनेत्री अनुष्का शर्माशी झाले. मात्र, लग्नापूर्वी विराट आणि जिनिलियाने अनेक नामांकित ब्रँडसाठी एकत्र जाहिराती केल्या होत्या. त्यातीलच एक जाहिरात विशेष वादात अडकली होती आणि बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.

नेमकी काय होती ती जाहिरात?

ही जाहिरात एका बॅग ब्रँडसाठी होती, ज्यामध्ये विराट कोहली पायलटच्या भूमिकेत आणि जेनेलिया एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत होती. जाहिरातीत विराट आपल्या को-पायलटसोबत विमान उडवत असतो. त्याचा को-पायलट वॉशरूममध्ये जातो, आणि त्याचवेळेस जिनिलिया कॉकपिटमध्ये येते. त्यानंतर दोघांमध्ये रोमान्स सुरू होतो, ज्यामुळे विमानातील प्रवाशांचे प्राण धोक्यात येतात, असा दृश्यात्मक भाग दाखवण्यात आला होता. या कथानकामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही जाहिरात अत्यंत बेजबाबदार असल्याचे मत व्यक्त झाले आणि ती तात्काळ बॅन करण्यात आली.

विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुन्हा उफाळला वाद 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. त्यामध्ये सुमारे 300 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक रेडिट युजरने ही वादग्रस्त जाहिरात पुन्हा शेअर केली. त्यानंतर ती सोशलमीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

आजही ही जाहिरात काही यूट्यूब चॅनेल्सवर दिसते, पण ती अधिकृत ब्रँड्स किंवा प्रसारमाध्यमांनी केव्हाच काढून टाकलेली आहे. विराट आणि जेनेलियाच्या त्या चर्चित जाहिरातीचा हा इतिहास पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात आले असून कारणही तितकंच गंभीर होतं.https://www.lokshahi.com/entertainment/bollywood-actress-sonakshi-sinha-shared-her-horrific-experiance

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com