ताज्या बातम्या
Indapur Police : पुण्यातील आरोपीला बीडमध्ये बेड्या, इंदापुरात 6 गुन्हे दाखल
पुण्यातील आरोपीला बीडमध्ये अटक, इंदापुरात सहा गुन्हे दाखल. अंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल आणि एक पिस्तुल राऊंड जप्त केली.
बीडच्या अंभोरा पोलिसांनी दोन गावठी पिस्तुल आणि एक पिस्तुल राऊंड जप्त केली आहे. यासह पुण्यातील आरोपीला बीड जिल्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून त्याच्या इतर साथीदारावर, आष्टी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आष्टी तालुक्यातील केरूळ येथे छापा टाकला असता, इंदापूर येथे राहणाऱ्या दत्तू कांबळे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन गावठी पिस्तुल आणि एक पिस्तुल राऊंड आढळून आली आहे. सुरू आहे.
याबरोबर या आरोपीने एका अल्पवयीन मुलीला पळवून आणले होते. दरम्यान पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन अल्पवयीन मुलीस इंदापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी दत्तू कांबळे याच्यावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.