PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi : यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

( PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना देशवासीयांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू असलेल्या योजनेचा उल्लेख करत त्यांनी यंदाच्या दिवाळीनंतर नवीन जीएसटी सुधारणा लागू करण्याची घोषणा केली. या सुधारणा करदर कमी करतील, व्यवहार अधिक सुलभ करतील आणि दैनंदिन वस्तू अधिक स्वस्त होतील. यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लवकरच लागू होतील.

“आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करा. खतांसाठी आपण परदेशावर अवलंबून आहोत, त्याचा साठा करून हे अवलंबन कमी करूयात. तसेच, येत्या काळात ईव्ही बॅटरीचे उत्पादन आपणच करायला हवे.”

पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत उद्योजकतेला प्रचंड चालना मिळाली असून लाखो स्टार्टअप्स देशाला आर्थिक बळ देत आहेत. ज्यामुळे ते आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकतील.

दिवाळीनंतर लागू होणाऱ्या या नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणामुळे कररचना अधिक पारदर्शक होईल, व्यापार-व्यवहार सुलभ होतील आणि ग्राहकांना दैनंदिन वापरातील वस्तू कमी किमतीत मिळतील. उद्योगवाढीस गती देतील आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळवून देतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com