Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे. 14 साली जे मोदीजी म्हणाले होते त्या अच्छे दिनाची सुरुवात येत्या 4 जूनपासून होईल. कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येतं आहे. जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न हे सगळे अख्या देशामध्ये चर्चिले गेलेलं आहेत. शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे पूर्ण व्यक्तीला बदनाम करुन टाकायचं, पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा.

महत्वाचा मुद्दा जो मी कालच्या भाषणातसुद्धा मांडला. महाराष्ट्राला हे बदनाम करत आहेत. महाराष्ट्राला लुटता आहेत. मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाही आहे. मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं. ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल. परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होते त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू. सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे. असा कारभार जगात कुठेही नसेल. एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी, गद्दारांच्या प्रचारासाठी. अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाला आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेलं आहेत. तरीदेखील अक्षरशा लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या हुकूमशाहीचा प्रचार करता आहेत. असा प्रकार कुठेही घडलेला नाही.

मी जे काही म्हणतो, जे देतील साथ, त्यांचा करु घात. एक दिड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की, एकच पक्ष राहील. मी काल माझ्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आरएसएसलासुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल एका मुलाखतीत नड्डा साहेबांनी म्हटले आहे की, आता भाजपा आता स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आरएसएसची गरज नाही. म्हणजे आता पुढच्यावर्षीचं 100वं वर्ष. म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय? कारण संघालासुद्धा हे नष्ट करुन टाकतील. ही हुकूमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला. त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्याच संस्थेला हे संपवायला निघालेलं आहेत. त्याचकरता मी काल जे काही म्हटलं की, यांना गद्दारांची घराणेशाही चालतं पण प्रमोद महाजनांची चालत नाही, आमची चालत नाही. हा सगळा प्रकार घृणास्पद आहे. याच्यावरती मी वेळोवेळी बोललंलो आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com