इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता इंडिया आघाडीची 18 मे रोजी मुंबईत प्रचारसभा होणार आहे. मुंबईच्या बीकेसीमध्ये ही जाहीर सभा पार पडणार आहे.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील निवडणूक २० मे रोजी होणार आहे. या सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेत आता इंडिया आघाडीचे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com