Aditya Thackeray
Aditya Thackeray

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

४ जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा विश्वास व्यक्ते केला.
Published by :

Aditya Thackeray On NDA Government : विरोधक आम्हाला बोलतात, तुम्ही नकली आहात, तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं. पण आम्हाला बोलणाऱ्यांनी हिंम्मतच सोडली आहे. तुम्ही आमच्यासमोर डुल्पिकेट नावं उभी करायला लागले आहात. देशभरात तुमची काय ताकद आहे? देशाच्या प्रत्येक राज्यात बदल घडत आहे. परिवर्तन होत आहे. ४ जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर तोफ डागली आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा विश्वास व्यक्ते केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना उमेदवारांसाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, भावी खासदार विनायकर राऊत त्यांच्या भाषणात म्हणाले, माझ्या नावाचा डमी उमेदवार उभा करण्यात आला आहे. विरोधकांनी हे सर्व ठिकाणी केलं आहे. दक्षिण मुंबई असो किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे मतदारसंघात असो, जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. तिथे भाजपने डप्लिकेट उमेदवार उभे केले आहेत, जे डल्पिकेट नावाचे आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, तिथेही त्यांनी तुतारीच्या चिन्हाजवळ वेगळ्या तुतारीचा प्रयत्न केला आहे. ह्यांनी डुप्लिकेट नावाचे लोक जरी उभे केले, तरी त्यांना मत मिळत नाही. ना एनडीए जिंकते, ना भाजप जिंकते.

म्हणून हे बाहेरचे लोक आपल्याला शिकवायला लागले आहेत, असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण, नकली राष्ट्रवादी कोण आणि असली राष्ट्रवादी कोण..आम्हाला बोलतात, तुम्ही नकली आहात, तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं. पण तुम्ही हिंम्मतच सोडली आहे. आमच्यासमोर तुम्ही डुल्पिकेट नावं उभी करायला लागले आहात. देशभरात तुमची काय ताकद आहे? देशाच्या प्रत्येक राज्यात बदल घडत आहे. परिवर्तन होत आहे आणि ४ जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार.

हे आता ठामपणे आपल्याला कळायला लागत आहे. यांची जाहीरात पाहिल्यावर असं वाटतं. ते इंडिया शायनिंगसारखं विकसीत भारत सुरु केलं आहे. अबकी बार ४०० पारचा नारा देत आहे. एक दोन आठवडे हे ऐकलं, त्यानंतर आता ४०० पार गायब झालं आहे. त्यानंतर आलं मोदी सरकार. ते गायब झालं. त्यानंतर म्हणाले भाजप सरकार. तेही गायब झालं. आता हे एनडीए सरकारवर आले आहेत. भाजपची परिस्थिती अशी आहे, ते देशात २०० पारही करु शकत नाहीत. तुम्ही मशालला मतदान करु नका, तुम्ही भाजपला मतदान करा, तुम्हाला असं कुणी सांगितलं तर, ते सांगतील, भाजप सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षाला मतदान केलं तर तुमचं मतदान फुकट जाणार आहे. कारण आम्हीच सत्तेवर येणार आहोत.

ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही भारतात ४०० पार करणार नाहीत. मग तुम्ही कोणत्या देशातून ४०० पार करणार आहेत, ते सांगा. साऊतमधून साफ आणि नॉर्थमधून हाफ, अशी भाजपची परिस्थिती होणार आहे. दक्षिण भारतात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कुठेही दक्षिण भारतात भाजप जिंकत नाही. भाजपची एकही सीट येत नाही. पाच वर्षापूर्वी ३७० कलम हटवलं होतं. आपणही त्याला पाठिंबा दिला होता. ३७० कलम हटवलं पाहिजे, असं आपलंही स्वप्न होतं. ते काढल्यानंतर ते आपलं सरकार होतं, ते एनडीएचं सरकार होतं. पण ते काढल्यानंतर पाच वर्षात जम्मू काश्मीरमध्ये सुख शांती येतील, प्रगती होईल. तेथील काश्मीर पंडीतांना त्यांच्या घरी जाण्याची संधी पुन्हा मिळेल. पण तसं काही झालं नाही.

भाजपला मला विचारायचं आहे, ३७० कलम काढून पाच वर्ष झाली, तुम्ही दावा करत आहात, तुम्ही दहशतवाद संपवला. तुम्ही संगता की, सर्व ठिकाणी सुख शांती आली आहे. प्रगती झाली आहे. तुम्ही दावा करता की, तुमचं तिथे राज्य निर्माण झालं आहे, मग पाच वर्षांनंतरही भाजपला काश्मीरमधून लढायची हिंम्मत का नाहीय. काश्मीरमध्ये भाजपने एकही उमेदवार उभा केलेला नाही. मागच्या पाच वर्षात लडाखचे भाजपचे खासदार होते, त्यांनी यावर्षी राजीनामा दिलेला आहे. लडाखी नागरिकांची त्यांनी माफी मागितली. ते म्हणाले, चुकून मी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले, असं मी पुन्हा करणार नाही. कारण भाजपने लडाखची वाट लावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com