PM Narendra Modi On Congress
PM Narendra Modi On Congress

काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर चर्चा करताना भारताला लोकशाहीची जननी म्हटलं आहे. तसेच काँग्रेसवर यावेळी टिका ही केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

लोकसभेत संविधानावर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. भारत लोकशाहीची जननी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. भारत प्रगती पथावर असल्याचं त्यांनी म्हटलं. तर काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

  • भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली. हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. संसदेतही हा उत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानकर्त्यांचे आभार मानले. तसेच देशातील नागरिकांचे आभार मानले आहेत.

  • भारत लोकशाहीची जननी: संविधानकर्त्यांनी भारताच्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाला संविधानामध्ये विशेष महत्त्व दिलं आहे.

  • संविधानामध्ये महिलांना समान हक्क: संविधान सभेतही महिलांचा सहभाग होता. संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. भारताच्या राष्ट्रपती या महिला आहेत ही अभिमानाची बाब आहे. संसदेत महिलांची संख्याबळ वाढत आहे. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.

  • कॉंग्रेसकडून 75 वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न: काही लोकांनी विविधतेत विरोधाभास शोधला. इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर केला. इंदिरा गांधींनी खुर्चीसाठी आणीबाणी लादली म्हणत पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. 75 वेळा कॉंग्रेसचा संविधान बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला असल्याचा आरोप केला आहे. 55 वर्षात देशात एकाच परिवाराने राज्य केलं. पंतप्रधान मोदी यांनी गांधी परिवारावर निशाणा साधला आहे.

  • काँग्रेसच्या परिवाराने संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. देशात ५५ वर्षे एकाच परिवाराने राज्य केलं. या परिवाराने संविधानाला आव्हान दिलं होतं. काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती. ६ दशकांत ७५ वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी खुर्चीसाठी आणीबाणी लादली होती. आणीबाणीमध्ये संविधानाची मूल्यांवर गदा आणण्यात आली. काँग्रेसने संविधानाला धक्का लावण्याची एकही संधी सोडली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com