lucknow Crime : धक्कादायक ! प्रियकरासाठी आईनेच 6 वर्षीय चिमुकलीच्या पोटावर बसूनच दाबला गळा, पुढे जे झालं ते...
उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेत एका आईने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीचा गळा दाबून जीव घेतल्याचा आरोप आहे. ही घटना तिच्या प्रियकरासोबतचे नाते टिकवण्यासाठी घडल्याचे तपासात पुढे आले आहे. ही घटना घडली खंडारी बाजार परिसरातील चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये, जिथे रोशनी नावाची महिला तिच्या प्रियकर उदितसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. पीडित मुलगी सोनाच्या मृत्यूनंतरही दोघांनी घरीच बसून पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे.
हत्या आणि आरोपांची मालिका
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं समजतं की, आरोपी महिला रोशनीने पती शाहरुखपासून वेगळं राहत असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करून त्याला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न केला होता. याआधी ती तिच्या मेहुणा, सासू आणि इतर नातेवाईकांविरुद्धही विविध तक्रारी करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात यशस्वी ठरली होती. मुलीच्या हत्येच्या दिवशी शाहरुख काही वेळासाठी घरी आला होता. त्यानंतर वाद झाल्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर रोशनीने मुलीच्या पोटावर बसून गळा दाबला आणि रक्त येऊ लागल्यावरही थांबली नाही.
गुन्ह्याची कबुली
गंभीर बाब म्हणजे, हत्या झाल्यानंतर तब्बल 36 तासांनंतरच पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला रोशनीने शाहरुखवर हत्या केल्याचा आरोप केला. मात्र, फॉरेन्सिक तपासात आणि सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर आलं आणि रोशनीची भूमिका उघड झाली. तिने कबूल केलं की, शाहरुखला अडचणीत आणण्यासाठी तिने प्रियकरासोबत मिळूनच हत्या केली. शाहरुखने यापूर्वीच रोशनीविरोधात 18 मे रोजी पोलीस तक्रार दिली होती. या तक्रारीत त्याने सांगितलं होतं की रोशनीने जबरदस्तीने फ्लॅट ताब्यात घेऊन प्रियकरासोबत राहत असल्यामुळे तो वेगळ्या ठिकाणी भाड्याने राहत आहे.