Cold Wave : भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

Cold Wave : भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी कहर करत आहे. गारठा सातत्याने वाढतोय. सकाळच्या वेळी थंडगार वारे वाहत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी कहर करत आहे. गारठा सातत्याने वाढतोय. सकाळच्या वेळी थंडगार वारे वाहत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून उत्तरेकडून शीत लहरी राज्यात दाखल होत आहेत. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी अशीच कमी अधिक राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी केला. पुढील काही दिवस राज्यात हुडहुडी वाढणार स्पष्ट आहे.

पंबाज, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होत असून तापमानात मोठी घट होत आहे. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यातही पारा घसरत चालला आहे. परभणी 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे 6.1 अंश, निफाड 6.3 अंश सेल्सिअस, जळगाव 7 अंश, नाशिक, पुणे, मालेगाव येथे 9 अंशांच्या कमी तापमान होते.

भंडारा, गोदिंया येथे 10 अंशपर्यंत तामानाची नोंद झाली. आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यासोबतच भारतीय हवामान विभागाने नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, सोलापूर आणि पुणे येथे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकचा निफाड तालुका गारठला.

सलग सहाव्या दिवशी निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा पाच ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान बघायला मिळाला. रुई येथे 5.3 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणावा लागतोय कांदा विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत. या थंडीपासून आधार मिळवण्यासाठी शेतकरी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. त्यामध्येच पुढील काही दिवसांमध्य थंडी वाढण्याचे संकेत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com